म. फुले

जातीसंस्था व तिच्या कार्यपद्धतीवर या भाषणात जेवढ़या खोलवर जावुन बाबासाहेबांनी विचार केला आहे;तेवढा इतर कोणी केला असावा असे वाटत नाही. जातीसंस्था हे भारतीय समाजजीवनाचे एक अंगभूत वैशिष्ट्य आहे.जगामध्ये विषमता आहे,उच्च-नीचतेचा एक संघर्ष आहे पण त्याला भारतातल्या सारखी 'पावित्र्याची' जोड़ नाही. त्यामुळे त्यात बद्दल होण्याची शक्यता आहे.परंतू भारतात ती जन्मजात असल्यामुळे व तो दैवी व धार्मिक आदेशानुसार असल्याची एक मानसिकता भारतीय व्यक्तीमध्ये असल्यामुळे त्यात बद्दल नाही. त्यामुळे जगभरातील समाजव्यवस्थेचा समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष सुरु आहे.परंतू जेथे जेथे ही विषमता धर्माधिष्ठित पावित्र्याच्या कल्पनेत अड़कली तेथे अधिकार मिळूनही मानवीसमूह पंगू बनतो.त्यासाठी केवळ समतेवर आधारित समाजरचना उभी करणे पुरेसे ठरत नाही, तर धर्माच्या नावाने झालेले संस्कार व त्यातून निर्माण झालेली मानसिकता हाटविन्याचे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सोदाहरण देवून स्पष्ट केले आहे.अस्पृश्यता,भेदभाव,उच्च-नीच या भावना नष्ट करण्यासाठी त्यांची निर्मित्ती करणारे घटक व ती संस्कारित करणारी यंत्रणा आपल्याला नष्ट करावी लागेल.जातीव्यवस्थेचा हा पाया स्पष्ट करून तो उध्वस्त करण्याची गरज त्यांनी येथे प्रतिपादन केली आहे.

जयभीम
सुचिताताई खडसे

Comments

Popular posts from this blog

जाती पद्धती

आयुष्यावर बोलू काही

M. Fule